मुंबई | Mumbai
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित शार्पशूटर आणि पंजाब पोलिसांच्या तुकडीमध्ये आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास चकमक (encounter) उडाली.
पंजाबमधील अमृतसरजवळच्या गावात ही चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन पोलीस जखमी झाले आहेत. त्याचवेळी एका शूटरचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी चकमकीदरम्यान मारेकऱ्यांना आत्मसमर्पण करण्याचे वारंवार आवाहन केले, परंतु मारेकरी सतत गोळीबार करत राहिल्यामुळे प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांना एके- ४७ चा वापर करावा लागला.