प्रदीप शर्मांवर हे गंभीर आरोप: आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता

प्रदीप शर्मांवर हे गंभीर आरोप: आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता
प्रदीप शर्मा

नवी दिल्ली

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) या हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी सांगितलं. दरम्यान प्रदीप शर्माला न्यायालयानं 28 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रदीप शर्मा
बारावीचा निकाल 31 जुलै रोजी, असे ठरले सूत्र

दरम्यान, मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार प्रदीप शर्माने वाझेसोबत या हत्येचा कट रचला. या कामासाठी शर्माने आपली माणसं पुरवली, विनायक शिंदे, लातूर इथून अटक करण्यात आलेले दोन आरोपी संतोष शेलार, आनंद यादव आणि दोन अन्य वाँटेड आरोपी या सगळ्यांनी मिळून शर्माच्या सांगण्यावरुन आधी मनसुखची हत्या केली आणि नंतर लाल रंगाच्या तवेरा गाडीमध्ये मनसुखचा मृत्यदेह घेऊन रेतीबंदरला गेले. रेतीबंदर ही जागा आणि लाल तवेरा गाडी शर्माने उपलब्ध करुन दिली होती. इतकच नाही तर या सगळ्यांना या कामासाठी पैसे आणि काम झाल्यानंतर लपवण्याचं कामही शर्माने केलं. पण अटक माजी पोलीस अधिकारी सुनील मानेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोष शेलार आणि आनंद यादवाला लातूरमधून अटक केली. या दोघांनी शर्माचं नाव एनआयए समोर सांगितलं.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसुख यांच्या हत्येमागे प्रदीप शर्मा मास्टरमाइंड होता. एनआयएकडून अटकेत असलेले विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव प्रदीप शर्माची माणसं होती. प्रदीप शर्माच्या म्हणण्यावर त्यांनी मनसुख हिरणची हत्या करून त्याची बॉडी डीसपोज केली होती. प्रदीप शर्मा याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा मनसुख किरण मृत्यू प्रकरण आणि स्पोटक प्रकरण तापलं आहे. येणाऱ्या दिवसात यामध्ये अजून बडे खुलासे आणि मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख

मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी

113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे

शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव

1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते

लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती

2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले

प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं

2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com