इलॉन मस्ककडून ट्विटर खरेदीचा करार रद्द; 'हे' आहे कारण

इलॉन मस्ककडून ट्विटर खरेदीचा करार रद्द; 'हे' आहे कारण

नवी दिल्ली । New Delhi

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Industrialist) इलॉन मस्कने ट्विटरसोबतचा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी (दि.८) ट्विटर विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला आहे. इलॉन मस्क यांनी २५ एप्रिल रोजी ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ५४.२० बिलियन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर दिली होती...

याबाबत इलॉन मस्क यांच्या वकिलांनी सांगितले की, ट्विटर अनेक विनंत्या करूनही बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यात अयशस्वी झाले. “मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे ते असे करत आहेत. ट्विटरने इलॉन मस्क यांना चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा करार त्यावरच अवलंबून होता," असे मस्क यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

दरम्यान, इलॉन मस्क यांच्याकडून करार रद्द करत असल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटरनेही आता टोकाची भूमिका घेतली आहे. याबाबत ट्विटरचे अध्यक्ष (Twitter President) ब्रेट टायलो (Bret taylor) यांनी म्हटले आहे की, कंपनीला ही डील पूर्ण करण्याची इच्छा आहे आणि कायदेशीर गोष्टीचे पालन करुन यासाठी आम्ही कोर्टातही जाण्याची तयारी करत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com