Elon Musk अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा टॉपला; अदानी किती नंबरला?

Elon Musk
Elon Musk

दिल्ली | Delhi

जगातल्या अब्जाधीशांची नवी यादी प्रसिद्ध झाली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्कने पुन्हा एकदा या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीनुसार, आता मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.

मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत झालेल्या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत नंबर वनवर असणारे फ्रान्सचे उद्योजक बर्नार्ड अनॉल्ट(Bernard Arnault) दुसऱ्या क्रमांकावर खाली घसरले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट तर तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. त्यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्या खालोखाल बिल गेट्स आणि वॉरन बफेट आहेत. त्यांची अनुक्रमे संपत्ती ११४ आणि १०६ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

श्रीमंतांच्या यादीत, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सातत्याने टॉप-१० मध्ये स्थान कायम ठेवले आहे. ८१.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, रिलायन्सचे चेअरमन जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या २४ तासांत त्याच्या संपत्तीत ६४६ मिलियन डॉलरची घट झाली आहे.

लॅरी पेज ८४.७ अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे, तर कार्लोस स्लिम हेलू ८३.२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेले गौतम अदानी ३७.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com