धबधबा पॉईंटनजीक क्रुझर उलटली; बालिकेचा मृत्यू, सात जखमी

धबधबा पॉईंटनजीक क्रुझर उलटली; बालिकेचा मृत्यू, सात जखमी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक-मुंबई (Nashik Mumbai Lane) लेनवर नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) धबधबा पॉईंटच्या (water fall point) वळणावर पहाटेला भीषण अपघात झाला. या अपघातात एका बालिकेचा मृत्यू झाला असून सात प्रवाशी जखमी झाले आहेत....(eleven year girl dies and seven passengers injured in an accident water fall point in kasara ghat)

अधिक माहिती अशी की, क्रुझर क्रमांक (MH 22 U 2801) भरधाव जात असतांना चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले. वाहन उलटल्यानंतर बाजूलाा असलेल्या संरक्षण भिंतीला आदळून अपघात झाला.

या अपघातात दर्शना विजय कांबळे (वय 11 वर्ष रा.मंठा जि.जालना) ही मुुलगी मयत झाली असून 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत मयत व जखमींना टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून दोन्हीकडची वहतूक सुरळीतपणे चालू आहे.

जखमींची नावे

1) लिहीलाबाई लिंबाजी राठोड वय -30 वर्ष रा. मालेगाव

2) लिंबाजी राठोड वय-40 वर्षे रा .मालेगाव

3) विठ्ठल चव्हाण वय - 45 रा. वसई

4) जयश्री गजानन पवार वय -34 रा. वसई

5) अनवी गजानन पवार वय-1 वर्ष रा.वसई

6) कल्पना राजेश जाधव वय- 30 वर्ष रा. वसई

7) शामराव चव्हाण वय -60 वर्ष रा. वसई

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com