Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडा'आयर्नमॅन' स्पर्धेत नाशिकचे अकरा खेळाडू चमकले

‘आयर्नमॅन’ स्पर्धेत नाशिकचे अकरा खेळाडू चमकले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गोवा ( Goa ) येथे रविवार ( 13 नोव्हे) रोजी झालेल्या ‘आर्यनमॅन’ स्पर्धेत नाशिकच्या अकरा खेळाडूंनी बाजी मारली. या स्पर्धेत महेंद्र छोरीया, डॉ. वैभव पाटील, प्रशांत डबरी, अरुण पालवे, डॉ. सुभाष पवार, दिपक भोसले, प्रदिप जाधव, अविनाश पाथरे, राहुल जगताप, रोहन भिंगे, सागर गायकवाड यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळे अगोदर पूर्ण केली.

- Advertisement -

गोव्याच्या मिरामार बीचवर (Miramar Beach) ही स्पर्धा सुरु झाली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व खा. तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी संपूर्ण जगातून 1 हजार 400 खेळाडू सहभागी झाले होते. भारताच्या बाहेर होणार्‍या स्पर्धांमध्ये काठिण्य पातळी कमी असते मात्र गोव्याच्या स्पर्धेत खळाडूंचा कस लागत होता.

या स्पर्धेत खेळाडूंना प्रामुख्याने दमट हवामानाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. समुद्रात पोहणे, सायकल चालवणे हे सर्वांत जास्त कठीण होते. थंड प्रदेशात स्पर्धा पूर्ण करणे सोपे असते मात्र दमट हवामानाच्या प्रदेशात लगेच थकवा जाणवतो अशा परिस्थितीत सगळ्यांना स्पर्धा पूर्ण करताना नाकीनऊ आले. 2 किलोमिटर समुद्रात पोहणे, 90 किलोमिटर सायकलिंग, 21 किलोमिटर रनींग खेळाडूंना पूर्ण करावी लागली.

छोरीया यांनी 2022 मध्ये तीन स्पर्धा यशस्वीपणे पूर्र केलेल्या आहेत. मार्च 2022 मध्ये दुबई 70.3, ऑगस्ट-22 मध्ये आयएम कझाक आणि आता ही गोवा 70.3 यशस्वीपणे पूर्ण केल्या असून येणार्‍या काळात आणखी एखादी स्पर्धा खेळण्याचा मानस असल्याचे त्यांनी सोंगितले. शहरातील अकरा खेळाडूंनी अगोदर अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धा पूर्ण केल्या असल्याचे छोरीया यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या