निवडणूक होणार की लांबणीवर पडणार

निवडणूक होणार की लांबणीवर पडणार

जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चर्चा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local body elections ) सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. मात्र,ओबीसींचे आरक्षण ठरविण्यासाठी मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आल्याने ओबीसींचा इंपेरिकल डाटा ( Imperical data of OBCs) मिळविण्यासाठी तीन स्तरांवरून प्रयत्न केला जात आहे.

तो डाटा मिळविण्यासाठी अधिक कालावधी लागला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असे सूतोवाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal )यांनी केले आहे.त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Zilla Parishad elections )गुढघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.

या इच्छुकांना आधीच गटाचे आरक्षण काय निघते,याची धाकधूक असताना त्यात पुन्हा निवडणूक लांबणीवर जाण्याच्या शक्यतेचे वृत्त आल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे.

इच्छुकांनी गटाचे संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन गाठीभेटी,मतदार भेटीतून लोकसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. काही इच्छुकांनी तर गटात सव्हें देखील सुरू केले आहेत. काही झाले तरी यंदा लढायचे, असा चंग बांधत अनेकांनी प्रचाराला प्रारंभ केल्याचे चित्र आहे. काही सदस्य पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडत आहे. करोना योद्धयांचा सत्कार, नेत्यांचे वाढदिवस अशा विविध माध्यमातून लोकसंपर्क वाढवत गट, गणात कार्यक्रम घेतले जात आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून विविध कार्यक्रम घेत आहेत.यामध्ये जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भाजपने बैठका घेणे, संघटनात्मक पक्ष बांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. विद्यमान पदाधिकारी, सदस्य यांनीही आमचे थोडे दिवस राहिले, असे सांगत गटांमध्ये कामाचा सपाटा लावला आहे.

अनेक कामांची उद्घाटने केली जात आहेत. विद्यमानसह माजी, तसेच इच्छुक मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे.पक्षाकडून आम्हाला तयारीला लागण्यास सांगितले आहे असे सांगण्यात येत आहे. इच्छुकांची ही तयारी सुरू असताना, दुसरीकडे मात्र करोनाची तिसरी लाट आल्यास निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

इच्छुकांच्या आडाख्यांवर पाणी

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका नको, असा सूर सर्वच राजकीय पक्षांनी आळवला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांची पंचायत झाली आहे. गटाच्या आरक्षणाची प्रतीक्षा करत पुढील राजकीय आडाखे बांधत अनेक इच्छुक कामाला लागलेले असतानाच मात्र, ओबीसी आरक्षण मुद्यामुळे इच्छुकांच्या आडाख्यांवर पाणी फिरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com