
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
राज्यातील राजकीय परीस्थिती लक्षात घेता निवडणूका, (Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. त्यामुळे मतदार यादी (voter list) दि. 31 मार्चपर्यंत अपडेट करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने (State Election Commission) दिले आहेत.
आगामी काळ निवडणूकांचा काळ आहे. आगामी एक दीड वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणूक होतील असे चित्र आहे. सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, पालिकांचाही निवडणूका आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांच्या याद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत.आयोगाने नुकताच जळगाव जिल्ह्यातील मतदार याद्यांचे सर्व्हेक्षण केले. त्यात अनेक बाबींवर दूरस्तीचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात 81 हजार मतदारांचे दुबार छायाचित्र
जिल्ह्यात 34 लाख 62 हजारावर मतदार आहेत. या मतदारांच्या यादीत तब्बल 1 लाख 63 हजार 889 मतदारांचे छायाचित्र ब्लर (अस्पष्ट) आहेत. ते फोटो काढून त्याजागी मतदारांचे नवीन फोटो टाकण्याचे आदेश राज्य निवडणूक विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यानूसार निवडणूक विभागाने संबंधित मतदाराच्या बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) मार्फत मतदारांशी संपर्क साधून नवीन फोटो अपडेट करण्याचे काम सुरू आहेत. जिल्ह्यात 80 वर्षावरील 1 लाख 15 हजार 717 मतदार आहेत. त्यांनी जेव्हा मतदार यादीत नाव नोंदविले असेल, तेव्हाचा फोटो अपलोड केला आहे.
त्यांचे सध्याचे फोटो अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. मतदार याद्यामध्ये पूर्वी 1 लाख 85 हजार मतदारांचे सारखे फोटो होते. त्यात संबंधितांकडून त्यांचेच नाव, फोटोही त्याचांच असल्याचे खात्री करून घेत दुसरा फोटो डिलीट करण्यात आला आहे. आता 81 हजार 566 मतदारांचे सारखे फोटो आहेत. ते अपडेट करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीला आधारकार्ड सिडींग (लिंक) करण्याचे काम केवळ 49 टक्के झाले आहे. जळगाव शहरात तर 18 ट़क्के मतदारांनी मतदार यादीला आधार सिडींग केले आहे. मतदारांची सारखी नावे असल्याची 2 हजार 128 मतदार आहेत. त्यांना बोलावून त्यांचीची नावे असल्याची खात्री करून घेतली जात आहे.