जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची निधी खर्चासाठी लगीनघाई

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची निधी खर्चासाठी लगीनघाई
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा परिषदेसह (Zilla Parishad) जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांसाठी (Panchayat Samiti) फेब्रुवारीमध्ये निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे...

त्यामुळे वेळेत निधी पदरात पाडून घेत आपापल्या गट व गणात विकासकामे करुन घेत पुन्हा मतदारांसमोर (Voters) जाण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण वगळून महापालिका निवडणुकांचा सुधारीत आराखडा मागवल्याने फेब्रुवारीत निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याचवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने सदस्यांची धावपळ सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांसोबत (NMC Elections) जिल्हा परिषदेचा निवडणूक (Zilla Parishad Election) कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.

करोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला मंजूर असलेल्या एकूण निधीपैकी ३० टक्के निधीला यापूर्वीच कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे ७० टक्के निधीतील दायित्व जाता शिल्लक असलेल्या निधीचे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने नियोजन सुरू आहे.

आपल्या गटातील विविध विकासकामांसाठी निधी (Fund) पदरात पाडून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने रस्त्यांसाठी बांधकाम विभागाला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

हा निधी बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी वापरण्याचा ठराव यापूर्वीच बांधकाम समितीने केला होता. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील ४३ गटांमधील रस्त्यांच्या कामाचे नियोजन या निधीतून केले जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटातच रस्त्यांची कामे करावीत यासाठी सदस्यांनी निधी मिळण्यासाठी पदाधिकाऱ्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com