अखेर दोन वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक

सोनिया गांधी
सोनिया गांधी

नवी दिल्ली:

काँग्रेस अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याच्या दोन वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला होता. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.

सोनिया गांधी
या कोरोना सेंटरमध्ये गाईचे दूध, तूप, दही व गोमूत्रापासून उपचार

काँग्रेस मतदानाच्या माध्यमातून आपला पुढील अध्यक्ष निवडणार आहे. २३ जूनला अंतर्गत मतदानाच्या माध्यमातून अध्यक्षांची निवड करणार आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. अखेर कार्यसमितीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसला गांधी घरण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तगडं आव्हान मिळू शकते असे काँग्रेसमधील एका गटाचं म्हणणे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com