जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

१० नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू; १७ जानेवारीला मतदान
जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात कोविड-१९ च्या Covid-19 पार्श्वभूमीवर मुदतवाढ मिळालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या APMC'S निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने State Cooperative Electoral Authority ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची २३ आॅक्टोबर २०२१ पर्यंत अथवा तत्पूर्वी मुदत संपुष्टात आली आहे. त्या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यामुळे बाजार समित्यांच्या निवडणूक APMC- Elections रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर २०२१ पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल व दि. १८ जानेवारी रोजी निकाल घोषित होईल.

जिल्ह्याातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा आदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

करोनाची लाट आटोक्यात आल्यानंतर, सहकार विभागाने राज्यातील स्थगित केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बँकांना निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

नाशिक जिल्हा बँकेवर प्रशासन असल्याने आणि बँकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने, बँकेची निवडणूक ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना २३ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आला होता. ही मुदतवाढ संपुष्टात येण्यापूर्वीच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला.

जिल्ह्यात १७ बाजार समित्या आहेत. त्यांपैकी १५ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान संपुष्टात आलेली आहे. यात महत्त्वाच्या असलेल्या नाशिक, पिंपळगाव व लासलगाव यांसह नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समित्यांच्या समावेश आहे. या बाजार समित्यांच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच निवडणुका

नगरपंचायती, नगरपरिषदा यांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिकांच्या निवडणुका फेब्रवारी २०२२ मध्ये होत आहेत. या निवडणुकांपूर्वीच बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असल्याने राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

असा आहे निवडणुक कार्यक्रम

मतदारयादी कार्यक्रम

१) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांनी प्रारूप

मतदारयादी प्रसिद्ध करणे १० नोव्हेंबर २०२१

२) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांनी प्रारूप

मतदारयादीवर आक्षेप-हरकती मागविणे १० ते २२ नोव्हेंब २०२१

३) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांनी प्राप्त

आक्षेप हरकतींवर निर्णय घेणे २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबर

४) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांनी अंतिम

मतदारयादी प्रसिद्ध करणे ६ डिसेंबर

निवडणूक कार्यक्रम

१) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित करणे १६ डिसेंबर

२) नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृती १६ ते २२ डिसेंबर

३) नामनिर्देशनपत्र प्रसिद्धी १६ डिसंबर ते २२ डिसेंबर

४) नामनिर्देशनपत्र छाननी २३ डिसेंबर

५) वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी २४ डिसेंबर

६) अर्ज माघारी २४ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२२

७) निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारी यादी प्रसिद्ध १० जानेवारी

८) मतदान १७ जानेवारी

९) मतमोजणी व निकाल १८ जानेवारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com