Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण जिल्ह्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे. यामध्ये नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे…

- Advertisement -

यामध्ये नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगावसह, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, चांदवड, देवळा, घोटी, दिंडोरी, कळवण, सुरगाणा व मालेगाव या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक पदाच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

यासाठी प्रारूप मतदार याद्या सोमवारी (दि.१४) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सतीश खरे यांनी जाहीर केला आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार दि. १४ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दि.२३ नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती नोंदविता येणार आहे. दि.२४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे. बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी या बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या