Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजिल्हा दूध संघाची निवडणूक 20 पर्यंत स्थगित

जिल्हा दूध संघाची निवडणूक 20 पर्यंत स्थगित

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Elections of Gram Panchayats) प्रक्रियेमुळे अ, ब , क या सहकारी संस्थाच्या निवडणुका (Cooperative Societies Elections) 20 डिसेंबरपर्यंत स्थगित (adjourned) केल्या आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचीही (Jalgaon District Cooperative Milk Producers Union) निवडणूक स्थगित (Election adjourned) करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer) संतोष बिडवई यांनी दिली.

- Advertisement -

सावदा येथे गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला : पाच जखमी

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची माघारीची आटोपल्यानंतर मंगळवारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. माघारीच्या प्रक्रीयेनंतर लगेचच शेतकरी आणि सहकार पॅनलचे उमेदवार प्रचाराला लागले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी या दोन्ही पॅनलच्या नेत्यांकडून मेळावे आणि प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करण्यात आले होते.

VISUAL STORY : जर्सी चित्रपटातील मृणालच्या या अवतारावर चाहते झालेत फिदाVISUAL STORY : आयुष्यभर या ‘दिवंगत’ अभिनेत्याने शिकवली नात्यांना जपण्याची कला

मात्र मंगळवारी सायंकाळी अचानकपणे सहकार क्षेत्रातील अ,ब आणि क वर्गातील संस्थांच्या निवडणूका दि. 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा दूध संघाचीही निवडणूक आता दि. 20 पर्यंत स्थगित करण्यात आली असून मतदानाची तारीख 20 नंतर जाहीर केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

सावद्याच्या गो रक्षकांवर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करा : खा. रक्षाताई खडसे

नेत्यांना आले टेंशन

जिल्हा दूध संघाची निवडणूक स्थगित झाल्यामुळे अनेक नेत्यांचे टेंशन वाढले आहे. प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याकरीता आणखी कसरत करावी लागणार आहे. तसेच निवडणूकीचा खर्च देखिल वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्यानेही नेते चिंताग्रस्त झाले आहे.

आडगाव येथे भर दिवसा घरफोडी

- Advertisment -

ताज्या बातम्या