Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा बँक अध्यक्ष,उपाध्यक्षांची निवड बुधवारी होणार

जिल्हा बँक अध्यक्ष,उपाध्यक्षांची निवड बुधवारी होणार

धुळे Dhule । प्रतिनिधी

धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule – Nandurbar District Central Co-operative Bank) अध्यक्ष व उपाध्यक्ष (Chairman and Vice Chairman) निवडीच्या (Election) हालचाली सुरु झाल्या आहेत. 1 डिसेंबरला निवड होणार असून जिल्हा उपनिबंधकांनी (District Deputy Registrar) निवडणूक कार्यक्रम (Election program) जाहीर केला आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या 17 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी 1 डिसेंबरला विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. त्या दिवशी उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते 11.15 वाजेपर्यंत भरता येईल. उमेदवारी अर्जांची छाननी सकाळी 11.15 ते 11.25 वाजेदरम्यान होईल. वैध अर्जांचे प्रकाशन सकाळी 11.30 वाजता होईल. माघारीसाठी सकाळी 11.35 ते 11.40 असा वेळ असेल. सकाळी 11.50 वाजता उमेदवारी अर्ज प्रसिध्द करण्यात येईल. दोन्ही पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरल्यास दुपारी 12 ते 12.30 वाजेदरम्यान मतदान घेण्यात येईल. त्यानंतर लगेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतमोजणी करुन निकाल जाहीर करण्यात येईल.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांची अध्यक्ष पदासाठी निवड निश्चित मानली जात आहे. बँकेचे उपाध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्यास दिले जाण्याची शक्यता आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

विविध मतदार संघातून माजी आ. राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, दर्यावगीर महंत, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावीत, शिला पाटील, सीमा रंधे, भरत माळी, प्रभाकर चव्हाण, आ. शिरीषकुमार नाईक, माजी आ. प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर, भगवान पाटील, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, संदीप वळवी हे नवनिर्वाचित सदस्य आहेत. आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या