जिल्हयातील बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलली
USER

जिल्हयातील बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलली

प्राधिकरणाचे पत्र प्राप्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या Board of Directors of the APMC निवडणुकीपूर्वी विविध विकास सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका elections प्रथम घ्याव्यात, नंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात APMC Elections ,असे न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर,राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील सुरू झालेली बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रीया रद्द केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्हयातील 13 बाजार समित्यांची आतापर्यंत राबविण्यात आलेली सर्व निवडणुक प्रक्रीया रद्द झाली आहे. याबाबतच निवडणुक प्राधिकरणाचे पत्र प्राप्त झाले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यासंबंधी अधिसूचना जारी केली. निवडणुका 23 नोव्हेंबर 2021 पासून पुढे तीन महिन्यांत घेण्याचे घोषित केले होते. त्यानुसार 10 नोव्हेंबरपासून मतदार याद्यांचा कार्यक्रम देखील जिल्ह्यात सुरू झाला होता. मात्र, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयास विविध सहकारी सोसायट्यांचे सभासद आणि संचालकांनी याचिका दाखल करून या निर्णयास औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

यात मुदत संपलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका प्रथम घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. निवडणुका झाल्या नाही, तर बाजार समितीमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राहात नाही, असा दावा केला होता. याची सुनावणी प्रक्रीया होऊन यात बाजार समितीच्या निवडणुका घेण्यापूर्वी सोसायटयांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानंतर बाजार समित्यांची निवडणुक प्रक्रीया गत आठवडयात स्थगित करण्यात आली होती.

सोमवारी (दि.22) राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने State Co-operative Electoral Authority आदेश काढत, आतापर्यंत बाजार समित्यांची झालेली निवडणुक प्रक्रीया रद्द करावी असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा आदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिध्द होऊन, हरकती मागविण्याची सुरू झालेली प्रक्रीया या आदेशाने रद्द झाली आहे.

सोसायटी निवडणुक प्रक्रीयेनंतर, बाजार समित्यांची नव्याने निवडणुक कार्यक्रम घोषीत केला जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. विविध कार्यकारी सोसायटयांच्या निवडणुक कार्यक्रम प्राधिकरणाकडून लवकरत घोषीत केला जाणार आहे,असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com