Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपची खेळी

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपची खेळी

मुंबई :

शिवसेनेच्या निलम गो-हे दुस-यांदा विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाचा विरोध डावलून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घाईघाईने जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

भाजपतर्फे ज्येष्ठ नेते विजय उर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंध असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाई गिरकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांना कोकणात मोठा जनाधार आहे.आमदार भाई गिरकर यांनी आज विधिमंडळात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार सुरेश धस, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या