मुदत संपलेल्या नगरपालिकांचे काय होणार?

उत्तर महाराष्ट्रात आहेत 'इतक्या' नगरपालिका; प्रशासक बसणार की मुदत वाढणार?
मुदत संपलेल्या नगरपालिकांचे काय होणार?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रात करोनाचा प्रार्दुभाव वाढत (Covid and omicron outbreak) असल्याने सार्वत्रिक निवडणुका (Election extend by election commission) घेणे सध्या शक्य नसल्याचे सांगितले जात आहे....

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा (Sthanik Swarajya Sanstha) कार्यकाळ संपुष्टात येताच अशा नगर परिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत.

जिल्हयात मनमाड, सिन्नर, येवला, भगूर, नांदगाव व सटाणा नगरपरिषदांवर प्रशासकराज येण्याची शक्यता आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून लवकरच निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरील सहाही नगरपरिषदांची मुदत २९ डिसेंबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची लगबग सुरू झाली होती. मात्र, राज्यात करोनाचा व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे निवडणुक प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे.

यामुळे निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपालिकांचा सार्वत्रिक निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलला आहे. म्हणून या नगरपालिकांचा कार्यकाळ संपताच या ठिकाणी प्रशासन नियुक्तीचे आदेश आयोगाने दिले.

त्यानूसार मनमाड (manmad), नांदगाव (nandgaon) नगरपरिषदेवर मुख्याधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे तर सिन्नर (Sinnar), येवला (Yeola), भगुर (Bhagur), सटाणा (Satana) नगरपरिषदेवर उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील २३ नगरपरिषदांवर प्रशासन नियुक्तीचे आदेश देण्यात येणार समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com