Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेश'हिमाचल प्रदेश' विधानसभा निवडणूकींचं बिगुल वाजलं; असा आहे निवडणूक कार्यक्रम

‘हिमाचल प्रदेश’ विधानसभा निवडणूकींचं बिगुल वाजलं; असा आहे निवडणूक कार्यक्रम

दिल्ली | Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. आजपासून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

- Advertisement -

आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर २०२२ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान हिमाचलमधील सत्ता अबाधित राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचारसभांचा धुरळा उडवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या भगिनी प्रियंका यांनी हिमाचलमधील प्रचाराची जबाबदारी स्विकारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या