Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखेत बदल; आता 'या' दिवशी मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखेत बदल; आता ‘या’ दिवशी मतदान

मुंबई | Mumbai

राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (GramPanchayat Election)१३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार होते. मात्र, यात राज्य निवडणुक आयोगाकडून बदल करण्यात आला असून आता १३ ऐवजी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे…

- Advertisement -

याबाबत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) एक प्रसिद्धपत्रक काढले असून त्यात सुधारित निवडणूक कार्यक्रम (Election Program) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान (voting) होणार असून नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी १४ ऑक्टोबर ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.

तसेच मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या