'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकांची तारीखही जाहीर
'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच राजकीय गरमागरमी होणार आहे.

याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार. तसेच या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ मार्चला होणार आहे.

'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
Video : निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबक नगरी दुमदुमली

दरम्यान, तीनही राज्याच्या विधानसभेची मुदत मार्च संपत असून या राज्यांत पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणात मतदान करतात. तसेच या तीनही राज्यात ६२.८ लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. तसेच तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ६० जागांसाठी मतदान होणार आहे.

'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; १६ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक जाहीर

पुण्यातील (Pune) कसबापेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर ८ फेब्रुवारीला अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे.

'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
राहुड घाटात 'द बर्निंग' बसचा थरार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com