Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

आयोगाची आज पत्रकार परिषद
Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

दिल्ली | Delhi

भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश (MP), राजस्थान (rajasthan), तेलंगणा (telangana), छत्तीसगड (chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (mizoram) वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत.

निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची (Assembly Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. त्यामुळे आता निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील 230, राजस्थानमधील 200, तेलंगणातील 119, छत्तीसगडमधील 90 आणि मिझोराममधील 40 विधानसभा जागांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत.

Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार
शेतकरी कुटुंबाला मारहाण करीत दागिने लुटले

पाच राज्यांमधील राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची सत्ता आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट पक्षाची सत्ता आहे. नोहेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. राजस्थान,मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये २०१८ प्रमाणेच एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तसेच त्यांनी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच पाचही राज्यांच्या मतदानाची तारीख वेगवेगळी असू शकते.

Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार
कॅनडामध्ये विमान कोसळलं! मुंबईच्या २ प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने राजस्थान, मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाचही राज्यांना भेटी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांसह सर्व निवडणूक राज्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून योजना अंतिम करण्यात आली आहे. आता फक्त निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायची आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाचही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com