... अन् वयाच्या सत्तरीत 'त्यांनी' बांधली लग्नगाठ

... अन् वयाच्या सत्तरीत 'त्यांनी' बांधली लग्नगाठ

कोल्हापूर | kolhapur

कुणाचं मन केव्हा कुणासोबत जुळेल, याचा काही नेम नाही. 'हम दो हमारे दो' वरून 'हम दो हमारा एक' आणि फ्लॅट संस्कृतीने अनेक मुलांना जन्मदाते नकोसे झाल्याने आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक मातापित्यांना (Parents) वृद्धाश्रमात (Old Age Home) एकमेकांना धीर देत कसेबसे आयुष्य जगावे लागते...

याच वृद्धाश्रमात असताना काहींच्या साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले तर त्यांना एकटेच दिवस काढावे लागतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमात राहणाऱ्या दोन समदु:खी वृद्ध वयाचे जोडपे याला अपवाद ठरले आहे. वयाच्या सत्तरीत हे जोडपे विवाहबंधनात (Marriage) अडकल्याने या विवाहाची महाराष्ट्रात (Maharashtra) सगळीकडे चर्चा रंगली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

... अन् वयाच्या सत्तरीत 'त्यांनी' बांधली लग्नगाठ
द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, अनुसया शिंदे (७०, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) अशी वृद्ध नववधू तर बाबूराव पाटील (७५, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) असे वराचे नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. यातील बाबूराव पाटील यांनी पत्नी (Wife) साथ सोडून गेल्यानंतर वृद्धाश्रमाची वाट धरली. तर अनुसया यांचे पती गेल्यानंतर त्याही एकाकी होत्या. त्यानंतर त्यांनी देखील वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करला. यानंतर वृद्धाश्रमात राहत असतांना दोघांचीही मनं जुळून आली. पंरतु, दोघांची हिंमत होत नसल्याने शेवटी मनं मोठे करून दोघांनी एकत्र येण्याचा विचार केला.

... अन् वयाच्या सत्तरीत 'त्यांनी' बांधली लग्नगाठ
... तर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं - संजय राऊत

त्यानंतर दोघांचीही तयारी असल्याने वृध्दाश्रमाचे चालक बाबासाहेब पुजारी यांनी वृध्दाश्रमात मांडव घालून कायदेशीर बाबींची (Legal Matters) पूर्तता करत अनुसया शिंदे आणि बाबूराव पाटील यांचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले. यानंतर आता दोघांच्याही आनंदात भर पडली असून आनंदी जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी स्वीकारला आहे.

... अन् वयाच्या सत्तरीत 'त्यांनी' बांधली लग्नगाठ
राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, देशाच्या संसदेत...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com