
मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय नाट्य सुरू आहे. हे नाट्य मुंबईपासून सुरू झाले, नंतर ते सुरतमार्गे गुवाहाटीपर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान गुवाहाटीत गुरुवारी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी ४२ आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.