Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या"…तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती"; शिंदेंच्या शिवसेनेतील 'या' नेत्याचा...

“…तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती”; शिंदेंच्या शिवसेनेतील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह (MLA) शिवसेनेतून (Shivsena) बंड केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले होते. तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून नुकताच दोन्ही गटांनी शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला.

- Advertisement -

अशातच आता शिंदे गटाचे (Shinde Group) नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी “आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती” असा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात पुन्हा राडा; उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने

दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी निश्चितपणे उठाव केला, तेव्हा त्यांना वाटलं की हे लोक प्रेमाने आले आहेत. ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला तोसुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. ते आमचेही विधीमंडळ नेते होते. त्यांचा अपमान तुम्ही का केला याचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे जरी रागवून गेले होते तरी त्यांनी परत येण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतली पाहिजे. शिंदे सच्चा माणूस आहे. सच्चा शिवसैनिक (Shivsainik) आहे. तेव्हा ते बोलले होते की, उठाव यशस्वी होणार नाही असे वाटले असते तर त्यावेळी माझ्यासोबतच्या आमदारांना परत पाठवले असते. मी एक फोन केला असता की माझी चूक झालीय पण या लोकांची चूक नाही. तिथंच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. असे म्हणणाऱ्याची कशा पद्धतीची माणुसकी असते हे समजते, असेही केसरकर यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या