Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री; बड्या नेत्याचा खुलासा

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री; बड्या नेत्याचा खुलासा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रोज काही ना नाही नवीन घडामोडी समोर येताना दिसतात. गेल्या वर्षी शिवसेनेत (shivsena) बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता तर टोकाला जाऊन पोहचली आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या विधानामुळे अनेकांना धक्का बसने साहजिक आहे.

भीषण अपघात!, तवेरा गाडी कोसळली थेट ८०० फूट खोल दरीत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाईट वाटत नसेल, ते उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कोल्हापुरात (Kolhapur) बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या