शिंदे फडणवीस सरकारचा 'मविआ'ला झटका; प्रभाग रचना रद्द; राजकीय वर्तुळात खळबळ

शिंदे फडणवीस सरकारचा 'मविआ'ला झटका; प्रभाग रचना रद्द; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आल्यानंतर पहिला सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महापालिका निवडणुकीत जी (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारने नियोजन केले आहे....

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. आरक्षणदेखील या निर्णयामुळे बदलून जाणार आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

2017 साली जितकी वॉर्ड संख्या होती, तितकीच वॉर्ड संख्या यंदाही कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. भाजपकडून आधीच ही मागणी करण्यात आली होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आले असल्यामुळे पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारने मोठा धक्का दिला आहे.

कुठलीही जनगणना 2017 नंतर झालेली नाही. 2021 ला जनगणना अपेक्षित होती. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे जनगणनाही झाली नाही आणि याच कारणामुळे आधीप्रमाणेच वार्डचे गणित राहावे अशी भाजपकडून सांगण्यात आले आहे. वाढवलेले वॉर्ड हे चुकीच्या पद्धतीने वाढवल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

थोड्याच दिवसांत 11 ते 16 महापालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर काही ठिकाणचे वॉर्ड वाढवलेले आहेत. त्यांना स्थगिती दिली जाणार असल्याचे समजते. अगदी हेच बदल जिल्हा परिषदेतही अपेक्षित असल्यामुळे या निर्णयानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीसाठीही हाच निर्णय लागू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com