
उस्मानाबाद | Osmanabad
स्वयंघोषित एकनाथ लोमटे महाराज (Eknath lomte Maharaj) यास कळंब प्रथम वर्ग न्यायालयाने (Court) पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे...
लोमटे महाराजाला भक्त महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी अटक केली होती. विशेष म्हणजे महाराज 45 दिवस फरार होता. लोमटे महाराजाने महिलेला शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भक्त महिलेचा विनयभंग केला होता.
लोमटे महाराजाने अशा पद्धतीने आणखी किती महिलांचा विनयभंग केला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेले तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजा विरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होता. अखेर 45 दिवसांनंतर कळंब पोलिसांनी लोमटे महाराजाला काल सकाळी अटक केली होती. न्यायालयाने लोमटे महाराजास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.