Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे ईडी चौकशीसाठी हजर

एकनाथ खडसे ईडी चौकशीसाठी हजर

मुंबई :

तु्म्ही ईडी काढाल तर आम्ही सीडी काढू, असे जाहीर आव्हान देणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले. यापुर्वी कोरोना झाल्यामुळे ते चौकशीला हजर झाले नव्हते.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी पाचारण केले होते. पण कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यांचा क्वॉरंटाईन काळ संपला आहे. यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. आपण ईडीच्या चौकशीला सहकार्य करु, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

काय आहे हे प्रकरण?

– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचे प्रकरण

– सर्व्हे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा

– सदर जमीन अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी – ३ कोटी ७५ लाख रुपये देऊन खरेदी केली

– या व्यवहाराची नोंदणी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली

– ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती 99 वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता

– या आरोपांनंतर खडसेंनी२०१६ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला

- Advertisment -

ताज्या बातम्या