कोर्टात खडसेंचे जवाई म्हणाले, राजकीय प्रकरणात मी बळीचा बकरा

कोर्टात खडसेंचे जवाई म्हणाले, राजकीय प्रकरणात मी बळीचा बकरा
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

पुणे

पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या (midc) जमीन खरेदी प्रकरणात ईडीच्या (ED) अटकेत असलेले एकनाथ खडसे (eknath khadse) यांचे जावई गिरीश चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडीने त्यांची १४ दिवस चौकशी केल्यानंतर त्यांच्या वकीलांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

एकनाथराव खडसे
केंद्रानंतर राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे, या दोन मंत्र्यांना धोका

एकनाथ खडसे (eknath khadse) यांची पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील MIDC चा भूखंड विकत घेतला होता. या भूखंडाची किंमत ही ३१ कोटींच्या घरात होती. परंतु एकनाथ खडसे यांनी त्यावेळी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत या जमिनीची किंमत ३ कोटी करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

ऍड मोहन टेकवडे यांनी गिरीश चौधरी यांच्यावतीने कोर्टासमोर बाजू मांडली. त्यात त्यांनी हे प्रकरण मनी लाँडरिंगचं नसून चौधरी यांना राजकीय प्रकरणात बळीचा बकरा बनवलं जात आहे. ७ जुलै रोजी ईडीने चौधरी यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान चौधरी यांना जे काही प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तर देताना ते सारखे चिडत होते अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान कोर्टाने चौधरी यांचा जामीन अर्जावर पुढील काही दिवसांत सुनावणी होईल असे म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com