खडसेंवर शस्त्रक्रिया होणार, वकिलांनी दिली कोर्टात माहिती

एकनाथ खडसे
एकनाथ खडसेराजकीय

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया (surgery)करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे मुंबई सेशन कोर्टात (court)अनुपस्थित आहेत.एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.

एकनाथ खडसे
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे (mandakini khadse)यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून (ed)चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत.

दमानिया यांची टीका

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या या माहितीनंतर टीकास्त्र सोडलं आहे. एकनाथ खडसे हे खोट्यावर खोटं बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

एकनाथ खडसे
नंदुरबारातील सर्व अकरा जागांचे निकाल जाहीर, भाजपच्या जागा घटल्या

काय आहे प्रकरण

एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांच्या नावानं खरेदी केला होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केला होता, तर त्याची त्यावेळची बाजार भावाची किंमत 40 कोटी इतकी होती असं सांगितलं जात होतं. नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार या जमिनीचे मूल्य दुप्पट म्हणजे ८० कोटी रुपये आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न खडसे कुटुंबीयांनी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. तेव्हापासून खडसे व त्यांचे कुटुंबीय या प्रकरणात अडकले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com