Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यायुरियासोबत दुसर्‍या खतांची जबरदस्ती !

युरियासोबत दुसर्‍या खतांची जबरदस्ती !

सद्य:स्थितीत जिल्ह्यात युरियासह अन्य खतांचा पुरवठा नियमित होत आहे. परंतु, जिल्ह्यात विक्रेत्यांकडे गोडाऊनमध्ये युरिया मुबलक प्रमाणात आहे. परंतु, शासनाकडून शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. गत पाच वर्षाच्या कालावधीत कधीही युरिया व अन्य खतांसाठी शेतकर्‍यांची अडवणूक झाल्याचे आठवत नाही. साठे बहद्दरांकडून युरिया दडवून ठेवला जात आहे. साठेबाजी करणार्‍यांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे,

माजी महसूल, कृषिमंत्री एकनाथराव खडसे

जळगाव – प्रतिनिधी :

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुकास्तरावर ग्रामीण भागात पावसाने देखील उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठीची कोळपणी, निंदणी आदी आंतर मशागत मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

- Advertisement -

या आंतर मशागतीनंतर सध्या युरिया खतासाठी शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडून युरिया खताची मागणी झाल्यानंतर, खत विक्रेत्यांकडून दुसरेही खत घेण्याचा आग्रह केला जातो. अन्यथा युरिया शिल्लक नसल्याचे सांगत खताच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली शेतकर्‍यांची दिशाभूल करीत अडवणूक केली जात आहे.

परंतु युरिया खत पाहिजे असेल तर युरिया गोणी सोबतच डीएपी, पोटॅश, मॅग्नेशियम या खतांसह कीटकनाशके देखील घेण्याचा आग्रह शेतकर्‍यांना केला जातो. त्यामुळे युरियासोबत शेतकर्‍यांना गरज नसताना इतर खते घ्यावी लागत आहेत. कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली युरिया खतासाठी शेतकर्‍यांची अडवणूक करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या