Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापती पत्नीचे जमेना!

पती पत्नीचे जमेना!

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

गेल्या पाच वर्षात घटस्फोट घेण्याचें प्रमाण वाढतच चाललें आहे. नाशिकमध्ये रोज आठ दाम्पत्य एकमेकाला सोडचिठठ्ी देत असून पाच वर्षांत तब्बल दहा हजार जणांनी काडीमोड घेतला आहे.

- Advertisement -

समाज व्यवस्थेत लग्न हा महत्त्वाचा संंस्कार असतो. दोन जीवांसह दोन कुटुंबांचे नातें लग्न सोहळ्यामुळेच जुळतें. सध्या प्रेमविवाहाला अधिक पसंती मिळत असली तरी कुटूंंबीयांनी ठरवून केलेल्या लग्नांची संख्या जास्तच आहे. मात्र हल्ली लग्नानंतर फारकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे लग्नाच्या सहा महिन्यांपासून ते तीन ते चार वर्षांत लग्न मोडल्याचे प्रकार जास्त समोर आले आहेत.

नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मते 2018 ते 2022 या पाच वर्षांमध्ये 10 हजार 14 जोडप्यांचे घटस्फोट झाले. 2018 मध्ये 1540 घटस्फोट, 2019 मध्ये 1715, 2020 मध्ये 2080, 2021 मध्ये 2327 तर 2022 मध्ये 2353 घटस्फोट झाल्याचे समोर आले आहेत. न्यायालयात दररोज एक अर्ज घटस्फोट मिळावा यासाठी दाखल होत आहे.रोज दोन दाम्पत्य फक्त तडजोडीला सामोरे जाऊन संसार कायम टिकवत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

घटस्फोटाची कारणे उदंडं

सोशल मीडियाचा अतिरेक वापर लॉकडाऊनमध्ये पती पत्नी एकत्र राहिल्याने वाद वाढले मोबाईलचा वापर वाढला पती-पत्नीच्या नात्यात घरच्यांनी हस्तक्षेप करणे करोनामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने वाद वाढले वाढती महागडी लाईफस्टाईल रिल्स बनवणे यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले मित्र मैत्रिणींशी सतत बोलणे.

पहिल्या तीन वर्षात घटस्फोट घेण्याचे प्रमाण आता 90टक्के झाले आहे. मुलींच्या आई वडिलांचा अवास्तव हस्तक्षेप, मोबाईलचा अतिवापर,सासू सासरेे घरात नको, वेगळे निघण्याच्या मुलींंच्या हट्टामुळे संंसारात कटुता वाढून प्रकरण फारकतीपर्यंंत जात आहे. त्याला समाज सुधारकांनीच आता प्रबोधन करण्याची गरज आहे. प्रकरणे खूपच गंभीर वळण घेेत असल्याचे दिसत आहे.

अ‍ॅड. धमेंद्र चव्हाण , अध्यक्ष ,पुरुष हक्क समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या