Thursday, April 25, 2024
Homeजळगावमहामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीचा आयशर चालक ठरला बळी

महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीचा आयशर चालक ठरला बळी

पारोळा Parola

धुळे सुरत महामार्गावर (Dhule Surat highway) असलेल्या मातीच्या ढिगार्‍याला धडकून आयशर ट्रक (Eicher Truck) उलटला. या अपघातात (accident) चालकाचा (driver) जागीच मृत्यू (died) झाला तर शेतकरी जखमी (Farmer injured)झाला असून त्याच्या टरबुजांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

उमवित कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे खास…

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखाब गावाजवळ काल रात्री 12 वाजेच्या सुमारास धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो हा अंधारात मातीच्या ढिगार्‍यावर आदळून पलटी झाला. या अपघातात पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालकाचा जागीच मृत्यु झाल्याने मंगरुळ गावात शोककळा पसरली आहे . तर 1 जण जखमी झाल्याची घटना घडली .

चोपडा तालुक्यातील वेले येथून आयशर गाडी ने टरबुज भरून सुरतकडे जात असतांना सोनखांब गावाजवळ हा अपघात झाला . त्यात आयशर चालक राजेंद्र दत्तु पाटील (वय 25 ) रा . मंगरूळ ता. पारोळा असे चालकाचे नांव आहे.

तर शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पोत भरलेले टरबूज हे महामार्गावर अस्ताव्यस्त विखुरले.त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. आयशर टेम्पोच्या केबिनचाही चक्काचूर झाला आहे.

कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आग

ठेकेदाराच्या निष्काळीपणाचा बळी

महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराने मातीचा ढिगारा टाकला होता. अंधारात हा मातीचा ढिगारा न दिसल्याने ट्रक सरळ या ढिगार्‍यावर जाऊन धडकला. यामुळे ट्रक पलटून चालकाचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या