गोदाघाटाचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील - मनपा आयुक्त

गोदाघाटाचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील - मनपा आयुक्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी नदी ( Godavari River )प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच कायमस्वरूपी सौंदर्य ( Beautification of Goda Ghat ) वाढविण्यासाठी तसेच त्याला टिकून ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार (Municipal Commissioner and Administrator Ramesh Pawar ) विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत असून सध्या गंगा गोदावरी घाट हा अतिक्रमणमुक्त परिसर झाल्याचे दिसून येत आहे.

कमी खर्चात गोदावरी प्रदूषण मुक्त करून खळाळून वाहणारी गोदा करण्याचा संकल्पच आयुक्तांनी घेतला आहे. शहरातील मलजल केंद्रातील पाणी नदीत मिसळले जाऊ नये, यासाठी नदी किनारी असलेले पूल, रस्ते यावरून मलवाहिका मुख्य मलजलशुद्धीकरण केंद्ांना जोडल्या तर मोठी समस्या दूर होऊ शकते.

गोदावरीचा उगम जवळच असल्याने त्या ठिकाणी तसेच नाशिकपर्यंत गटारीचे पाणी नदीत मिसळणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ठिकठिकाणी मलजलशुद्धीकरण केंद्र तयार करून गटारीचे पाणी शुद्ध करता येऊ शकते. पानवेलीचा प्रश्नही निकाली काढता येईल. आपले नागरिक परदेशातील खळाळणारी नदी पाहून प्रसन्न होतात. परंतु आपल्याच नदीचे खळाळणारे शुद्ध पाणी पाहिले तर किती समाधान होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी ही कल्पना सांगताना व्यक्त केला. अनुभवी आणि स्वछतेची त्यांना असलेली आवडही यातून दिसून आली.

नमामि गोदा प्रकल्प उपयुक्त

गोदावरी शुद्धीकरणासाठी नमानी गोदा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्यासाठी लवकरच सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांनतर ही कल्पना प्रत्यक्षात आणता येईल. गोदावरीच्या सौंदरीकरणाच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करता येईल. नदी किनारी असलेल्या प्रत्येक मंदिर परिसरात फुल, पूजा विक्रेते याना विशेष प्रकारचे सजावटीचे स्टोल तयार केल्यास दर्शनासाठी येणार्‍या भाविकानाही प्रसन्न वाटेल,अशी वातावरण निर्मिती करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास

नाशिकमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच नाशिककरांना एक चांगलं अनुभव मिळावा या दृष्टीने महापालिकेच्या फाळके स्मारकाचा विकास रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत लवकरच कन्सल्टंट (सल्लागार) ची नेमणूक करण्यात येऊन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी दिली.

पाथर्डी फाटा येथील नाशिकचे वैभव ठरलेल्या फाळके स्मारकला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. याबाबत तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र आता महापालिकेत येऊन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फाळके स्मारक महापालिकेनेच चालवावा अशी सूचना केल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे.

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर आपल्या फाळके स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सल्लागार निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून एक चांगला प्रोजेक्ट याठिकाणी तयार करण्याचा मानस महापालिका आयुक्त पवार यांनी व्यक्त केला आहे.

याठिकाणी चित्रपटांचे शूटिंग व्हावेत तसेच कलाकारांनी या ठिकाणी यावेत या पद्धतीने येथील वातावरण तयार करण्यात येणार आहे. अशा काही सुविधा फाळके स्मारकात मिळाल्या तर नागरिकांचा कल देखील या ठिकाणी जाण्याकडे वाढेल, चित्रपटाची शूटिंग पाहण्यासाठी लोक जातील व त्याचा वापर होणार आहे. यामुळे महसुलात देखील वाढ होणार आहे. यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली असून सल्लागार नेमणूक झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे.

Related Stories

No stories found.