Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागोदावरीची सुपर पॉवर जिवंत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे- जलतज्ञ राजेंद्र सिंह

गोदावरीची सुपर पॉवर जिवंत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे- जलतज्ञ राजेंद्र सिंह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

माणसाच्या विविध 17 आजारांना नष्ट करण्याची क्षमता गोदावरीच्या पाण्यामध्ये आहे. मात्र गोदावरीची ही सुपर पॉवर जिवंत करण्यासाठी गोदावरी नदी अविरल वाहती करण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले.

- Advertisement -

रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘अविरल गोदावरी’ या कार्यक्रमात देशदूतच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी घेतलेल्या मुलाखतीप्रसंगी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह बोलत होते. यावेळी राजेंद्र सिंह यांनी गोदावरीला अविरल करण्यासाठी तिचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी परिसराला हिरवेगार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ब्रह्मगिरीच्या उगमस्थानाजवळ जलप्रवाह वाढवण्यासाठी पूर्ण पर्वतराजीवर वृक्षवल्ली वाढवणे आवश्यक असल्याचे नमूद केले. गोदावरी नदी आज अत्यवस्थ अवस्थेत सांगताना शासन यंत्रणेकडून प्रत्यक्षात उपाययोजना करण्याऐवजी चुकीचे उपाय केले जात आहेत. गोदावरीच्या हृदयावर आजार आहे आणि इलाज चेहरापट्टी सुधारण्यावर केला जात असल्याचे खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गोदावरीच्या उपनद्यांबाबत बोलताना त्यांनी आईला स्वच्छ व आनंदी ठेवण्यासाठी मुले आनंदित राहणे आवश्यक असल्याचे सूचक विधान केले. नदीला मिळणार्‍या छोट्या उपनद्या स्वच्छ व वाहत्या असल्या तर निश्चितच गोदावरीचे स्वास्थ्य व्यवस्थित राहील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गोदावरीसाठी काम करताना या उपनद्यांवरही तितकेच काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, सत्संग फाउंडेशनचे वासुकी सुंदरम, तरुण भारतच्या इंदिरा खुराणा, चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव, नमामी गोदा फाऊंडेशनचे राजेश पंडित आदींसह मान्यवर उपस्थित हाते. यावेळी एमएटी आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंडात काँक्रिट नकोच

भारतात ताल, पाल आणि झाल या तत्त्वांवर नदीच्या काठावर कुंड बांधले गेलेले आहेत. त्यांचे महत्वही वेगळे आहेत. शरीरातील प्रत्येक धमनी जशी बनते, त्याप्रमाणे नदीकाठावर कुंडाची उभारणी आलेली आहे. कुंडांचे नदीसोबतचे नाते हे धमन्यांप्रमाणे आहे. हे कुंंड स्वच्छ ठेवणे हा देखील भाग महत्त्वाचा आहे. त्यात सिमेंट काँक्रिटीकरण करून त्यांचा श्वास आणखी गुदमरण्याचे काम आहे. त्यामुळे कुंडांमध्ये काँक्रीट ठेवूच नये, अशी भूमिका मांंडली. नाशिककरांनी नदीची प्रकृती ठीक ठेवायची असेल तर कुंडांच्या काँक्रीटचा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता नदीचे स्वास्थ्य व सुरक्षेसाठी एकत्र येऊन लढा उभारावा, असे आवाहन राजेंद्र सिंह यांनी यावेळी केले.

मनमोहन सिंग यांची दूरदृष्टी

शासन यंत्रणा नफा, तोट्याचे गणित लावत असतात. याचा विपरित अनुभव आल्याचे राजेंद्र सिंह यांनी एक उदाहरण सांगितले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भगीरथ नदीवर कोटी रुपये खर्च करण्याच्या शासनाच्या धोरणाला धुडकावून लावत भगीरथ नदी ही विकासकामांपासून दूर ठेवली. त्यामुळे आज अविरतपणे वाहत आहे. तत्कालीन मंत्र्यांनी भविष्यात कोटी खर्च होणार असल्याने शासनाला भुर्दंड पडेल, असे सूचित केले होते, मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नदीजीवनाला, स्वास्थ्याला महत्त्व देत गंगा हमारी माँ है, उसके लिए 2200 करोड रुपिया मुश्किल है क्या? असा प्रश्न उपस्थित करून नदीच्या संरक्षणाला महत्त्व दिले. त्यामुळे आजही नदी दिमाखात अविरत वाहत आहे.

नाशिक धोक्याच्या उंबरठ्यावर

नाशिकचे लोक देवाचे प्रेमी आहेत. मात्र निसर्गाचे चक्र बदलत आहे. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. आज गोदावरीला अविरत बनवण्याचे काम केले नाही तर भविष्यात विपरित परिणाम भोगावे लागतील. अरबी समुद्रातून येणार्‍या ढगांना थांबविले नाही तर पावसाचे चक्रही बदलेल. ते थांंबवण्यासाठी डोंगरमाथ्यांवर हिरवळ वाढवणे गरजेचे आहे. जर पावसाचे चक्र बदलले तर भविष्यात गोदावरी नदी मृत होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आपली गोदामाई स्वस्त व अविरत वाहणारी ठेवण्यासाठी उपाययोजनांवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.येऊन लढा उभारावा, असे आवाहन राजेंद्र सिंह यांनी यावेळी केले.

विविध उपसमित्यांची बांधणी

ब्रह्मगिरीच्या भेटीनंतर शहरातील समाजसेवी व्यक्तींच्या विविध समित्या बनवण्यात आल्या. प्रत्यक्षात ब्रह्मगिरीसाठी नोटिफिकेशन झालेले आहे. मात्र आयडेंटिफिकेशन आणि डीमार्केशन होणे बाकी आहे. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून त्यावर बॉबी व वासुकी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ब्रह्मगिरीच्या मोकळ्या भागावर वृक्षारोपणापूर्वी सध्या वेगवेगळे गवत वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही जबाबदारी तुषार पिंगळे व मनोज यांंच्याकडे देण्यात आली आहे. ते कोणते गवत योग्य राहील आणि कसे वाढवले पाहिजे, याचा अभ्यास करून त्यावर काम करतील.

पाणलोट समिती बनवण्यात आली आहे. त्या माध्यमातून राजेश पंडित, अपर्णा महेद्र महाजन मनोज व तुषार हे काम पाहणार आहेत. पर्वत शिखरावर पर्वत परिसरात बर्‍याच ठिकाणी दगड ढासळलेली आहेत. काही ठिकाणी ते ढिलेे झालेले आहेत. त्यांना पुन्हा बांधून सक्षम करुन जलप्रवाह डाेंंगरातच थांंबवण्याचा प्रयत्न त्यातून केला जाणार आहे. त्या ठिकाणी वृक्षारोपण करून या समितीने व्यापकतेने काम करायचे आहे. स्वच्छता उप समितीच्या माध्यमातून नदी परिसरातील स्वच्छतेवर लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली समिती काम करणार आहे. कुंडांचे पुनर्विकसन या उपसमितीच्या माध्यमातून प्रा. प्राजक्ता बस्ते, देवांंग जानी, बॉबी व वासुकी हे काम पाहणार आहेत. या सर्व कुंडांना तिर्थांप्रमाणे विकसित करण्याची जबाबदारी त्यांंच्यावर देण्यात आली आहे. स्त्री सशक्तीकरण या समितीचे काम राहुल रनाळकर, विजय इंगळे व तुलसी यांच्याकडे देण्यात आला असल्याचे जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी जाहीर केले.

घोषणा

‘गोदावरी की पवित्रता, ब्रह्मगिरी की हरियाली, निर नारी नदी, यही नारायण है’ या घोषवाक्यांच्या माध्यमातून त्यांनी नाशिककरांना गोदावरी संवर्धनाचा संदेश दिला.

आज ‘सफर गोदावरी’ची उपक्रमाचा शुभारं

दै. देशदूतच्या माध्यमातून आज (दि.1 मे) सफर गोदावरीची या उपक्रमाचा शुभारंभ जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता श्रीरामकुंड येथे करण्यात येणार आहे. दर महिन्यातून एकदा जनसामान्यांना गोदावरीची माहिती देण्यासोबतच संवर्धनाबद्दल जागरुक करण्याचा प्रयत्न राहणार आहे. येऊन लढा उभारावा, असे आवाहन राजेंद्र सिंह यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या