रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत

रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या निवडणुकीची (Municipal elections) रणधुमाळी सुरू झाली असून सगळ्याच प्रभागांतील चौकाचौकांत, पारांवर गप्पा रंगायला सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवकांना (Corporators) त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळणार की मतदार (voter) नवीन चेहर्‍यांना संधी देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यातच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना महापालिकेकडून (Municipal Corporation) नक्की काय अपेक्षित आहे, याचा विचार करणे होय. या निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर ‘देशदूत’ने (deshdoot) ‘जनता की बात’ (janata ki baat) मध्ये प्रभाग 6 मधील मतदारांशी संवाद (Communication with voters) साधून आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत जाणून घेतले. मतदारांनी दिलखुलासपणे अपेक्षा मांडल्या.

आमच्या प्रभागात जवळ जवळ सर्वच कामे झालेली आहेत. रस्ते, पाणी, लाईटची व्यवस्था झालेली आहे. आता आगामी काळात येणार्‍या लोकप्रतिनिधींनी उर्वरित कामे पूर्ण करावीत. त्याचबरोबर जे काही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

रवींद्र साठे, नागरिक

आगामी काळातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकासाला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर प्रभागातील रस्ते चांगले करावेत. त्याचबरोबर महिलांसाठी असे उद्योग सुरू करण्यात येऊन महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून त्या घरी राहून आपले काम करू शकतील. प्रभागात महिलांसाठी वेगवेगळे क्लासेस तसेच योजन राबवल्या गेल्या पाहिजेत. रस्त्यांवर अपघात होत आहेत हे अपघात कमी कसे करता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे.

रंजना काळे, गृहिणी

प्रभागात हॉकर्स झोनची आवश्यकता आहे. हे झोन तयार करण्याची गरज आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यावसाय करणे सुलभ होईल. परिणामी बेरोजगारी कमी होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे साधन मिळेल. त्याचप्रमाणे प्रभागात सुशोभिकरण झाले तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळेल. पाणी, रस्त्यांची कामे झालेली आहेत. त्यामुळे नागरिकांना काही अडचणी नाहीत. त्यामुळे आगामी लोकप्रतिनिधींनी उर्वरित कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा.

प्रकाश सैंदाणे, व्यावसायिक

आमच्या प्रभागात जवळ जवळ सर्वच कामे झालेली आहेत. रस्ते, पाणी, लाईटची व्यवस्था झालेली आहे. आता आगामी काळात येणार्‍या लोकप्रतिनिधींनी उर्वरित कामे पूर्ण करावीत. त्याचबरोबर जे काही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रभागात मोेरे मळा परिसर आहे. या परिसरात गुंठेवारीचे प्लॉट आहेत त्या ठिकाणी अनेक लोकांची नावे 7/12 ला लागलेली नाहीत. त्यामुळे कर्ज मिळत नाही. ही नावे लावण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रभागात सुशोभिकरण झाले पाहिजे त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी काही योजना आल्या पाहिजेत.

योगेश जाधव, मोरे मळा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com