सैन्यदलांकडून काश्मीरवासियांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न: यादव

सैन्यदलांकडून काश्मीरवासियांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न: यादव

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

काश्मीर (Kashmir) खोर्‍यात कायमच दहशतीचे वातावरण राहिले असून तेथील जनताही जीवमुठीत घेऊन आपले जीवन व्यतित करत आहे,हे जरी खरे असलेतरी कलम 370 (Section 370) हटविल्यानंतर तेथील परिस्थितीत अभूतपूर्व असे बदल होत आहेत.

कारवाया करणार्‍यांना बंदूकीने उत्तर देणारे सैन्यदलाचे जवान (Army personnel) बंदूक बाजूला ठेवून सलोख्याचे वातावरण निर्माण करत काश्मीरवासियांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन प्रसिध्द गिर्यारोहक,अभ्यासक व भोसला अँडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश यादव (Rishikesh Yadav, mountaineer, researcher and president of Bhosla Adventure Foundation) यांनी केले. भोसला मिलीटरी कॉलेजमध्ये (Bhosla Military College) एनडीए बॅचचे विद्यार्थी (Students of NDA Batch), सर्व विभागप्रमुख व शिक्षकांशी त्यांनी आज संवाद साधला.

कलम 370 (Section 370) हटविल्यानंतरची काश्मीरमधील (Kashmir) स्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर, नाशिक विभागाचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, खजिनदार शितल देशपांडे, कर्नल राम नायर, प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी यादव यांनी स्लाईडशोद्वारे मार्गदर्शन केले.ते म्हणाले,2002 ते 2008 पर्यत अतिरेकी कारवाया,आपआपसातील संघर्षामुळे काश्मीर अधिकच धुमसत राहिले.आम्ही आसाम (Assam), मिझोरम (Mizoram), मणिपूरसारख्या (Manipur) उत्तरेकडील राज्यामध्ये सीमालगतच्या गावात घरी राहण्याचा(होम स्टे) उपक्रम राबविला.

त्यातून पर्यटक व स्थानिकांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. काश्मीरमध्ये आपल्या मुलांना तेथील मुलांबरोबर ट्रेक करण्याची संधी दिली, त्यामुळे एक उत्साहाचे वातावरण दिसते. विशेषतः कलम 370 हटविल्यानंतर पोलिस व्यवस्थेत बदल झाला, ती केंद्राकडे गेल्याने स्थानिकांना काहीशी मोकळीक मिळाली आहे. आयएएस,आयपीएससारखे अधिकारी तेथे नेमले त्यामुळे त्याचे व स्थानिकांमधील सूर जुळले. त्यातूनच सद्भावनासारखे अनेक उपक्रम तेथे उभे राहिले,बंदूकीशिवायही शत्रुला आम्ही मारू शकतो ही भावना निर्माण झाली. असे ते म्हणाले.

साठहुन अधिक प्रकल्पांद्वारे काम

घर घर तिरंगा, मिशन फस्ट,पुस्तके लिहिण्यासाठी प्रोत्साहित करणे,महिलांच्या बचतगटांकडून तिरंग्यासारख्या वस्तू खरेदी करणे यासारखे साठहून अधिक प्रकल्प सध्या तेथे सुरु आहेत,असे नमूद करून यादव म्हणाले, 370 हटविल्यानंतर तेथील लोक मुक्तपणे वावरतांना दिसत आहेत. सामुदायिक कार्यक्रमांतही सहभाग वाढू लागला आहे. ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकविण्याबरोबरच भारत माता की जय,वंदे मातरम् च्या घोषणा ऐकू येत आहेत.

यापूर्वी पीओके(पाकव्याप्त काश्मीर) म्हणजे दहशतवादी तयार करण्याची एक फॅक्टरी म्हणून ओळखली जात होती. मात्र आता आजूबाजूच्या परिसरात आश्वासक बदल होत असून याचे श्रेय तेथील सैन्यदलाला दिले पाहिजे. यावेळी त्यांनी दललेक स्वच्छता मोहिम,कचिरा बाजार,दाचीग्राम नॅशनल पार्क,शंकराचार्य मंदीर,शाहबाद म्युझिअम,झिरोब्रिज मोहिम यासारख्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ.कुलकर्णी यांनी स्वागत केले. गायत्री जोशी यांनी सुत्रसंचालन केले.दत्ता निंबाळकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com