Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याउद्योग क्षेत्रात ‘कही खुशी, कही गम’

उद्योग क्षेत्रात ‘कही खुशी, कही गम’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मागील वर्ष उद्योग क्षेत्रासाठी अतिशय आणीबाणीचे ठरले होते. 2020 मध्ये करोनाने Corona देशभरात हाहाकार उडाला. त्यामुळे उद्योग-व्यापार Industries -trades क्षेत्रांमध्ये भीतीसोबतच अस्थैर्य निर्माण झाले होते.डिसेंबर 2020 नंतर व्यवहार सुरळीत होऊ लागले असतानाच पुन्हा 2021 च्या फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसर्‍या लाटेने दणका दिला आणि यात मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली.

- Advertisement -

त्याचा अनेक कुटूंबावर गंभीर परिणाम झाला. नाशिक औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसून आला. फेब्रुवारीपासून उद्योगाची चाके बंद पडली ती जून महिन्यापर्यंत. या कालावधीत उद्योग व व्यापार कामगारांचे रोजगार सर्वच ठप्प झाले होते. परिणामी कष्टकर्‍यांना रोजच्या जेवणाची भ्रांंत पडू लागली होती.

नागरिकांच्या मदतीसाठी शासन-प्रशासन अग्रेसर होते. त्यांच्या मदतीला व्यापार, उद्योग, सामाजिक संघटनाच नव्हे तर लोकप्रतिनिधींही सामाजिक भान जपत मदतीला धावले होते. अनेक ठिकाणी अन्नदान, धान्य दान, कपडे ,जीवनावश्यक साहित्यांची भेट देण्यास सुरुवात झाली होती.फेब्रुवारीमध्ये बंद झालेले उद्योग क्षेत्र मे अखेरपर्यंत काही प्रमाणात सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.

दुसर्‍या महामारीच्या काळात सुरक्षितता साधनांची वणवण जाणवत असल्याने पहिल्या टप्प्यात करोनाचा महाप्रादुर्भाव पाहून शासनाने उद्योगांना उपचाराच्या दृष्टीने मदतीची साधने उत्पादन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने मास्क, ग्लोव्हज, व्हेंटिलेटर या उत्पादनांना प्रतिसाद देण्यात आला. लॉकडाउन काळात त्या कारखान्यांनाच फक्त सुरू करण्यास परवानगी दिली होती.

अनेक उद्योगांनी आपली पारंपरिक उत्पादन प्रक्रिया बाजूला सारुन शासनाच्या व नागरिकांच्या मदतीसाठी नव्या वाटा चोखळल्या. या माध्यमातून उद्योगांच्या सामान्यांना मदत देण्याचा उद्देश समोर आला.

या दरम्यान इतर उद्योगांतून हाताला काम नाही. त्यामुळे कष्टकरीही त्रस्त झाले होते. केवळ उद्योग व्यापार बंद नव्हते तर बांधकाम क्षेत्रही ठप्प झाले होते. अशा काळात असंघटित बांधकाम क्षेत्रासाठी शासनाने माणसी 2 हजार रुपये मदत दिली. या कालावधीमध्ये घरात मोलमजुरी करणार्‍या घर कामगार महिलांना रोजगार मिळू शकला नाही. कारण संसर्गजन्य रोग फैलावत असल्यामुळे बहुतांश परिवारांनी मोलकरणींना घरात प्रवेश बंद केला होता. त्यामुळे अर्थातच त्यांची तर मोठी काेंंडी झाली होती.

2021च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उद्योग, व्यापार व संपूर्ण उलाढालीवर करोनाचा प्रभाव दिसून आला. उद्योगाची स्थिती वाईट असल्याने अनेक कामगारांना रोजगार गमवावे लागले.ज्यांचा रोजगार टिकला त्यांना निर्धारीत वेतनश्रेणीपेक्षा कमी वेतनावर काम करणे भाग पडले.अनेक कारखान्यांनी वेतन अर्धे करून कामगारांना वेतन अदा केले. त्याचा परिणाम निश्चितच कामगारांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येऊ लागला.

जून महिन्याच्या सुरुवातीला आणि मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काही व्यापार उद्योगांचे चक्र गतिमान झाल्याचे चित्र होते. शासनाच्या परवानगीने मनुष्यबळाच्या मर्यादेवर व सुरक्षिततेच्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कारखान्यांना परवानगी देण्यात आल्या. या सवलतीचा फायदा घेताना पहिल्या टप्प्यात 3 हजार उद्योगांनी उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडे लेखी परवानगी मागितली. त्यात कामगारांना प्रवासासाठी पास वाटपही करण्यात येत होते. त्यानंतर ही बंधने शिथिल होत गेली.

उद्योग व्यापाराची दारे मुक्त केली. उद्योगक्षेत्राची रक्तवाहिनी असलेल्या महिंद्रा व बॉश या दोन उद्योगांनी उत्पादन प्रक्रिया सुरू केल्यामुळे लघु व मध्यम उद्योगांमध्ये चैतन्य दिसून येत होते. त्यामुळे काही अंशानेे रोजगार मिळू लागला होता. मात्र संपूर्ण देशातील अर्थचक्र सक्षमपणे सुरू न झाल्याने तयार मालाची मागणी मंदावलेली होती. परिणामी पुन्हा एकदा उत्पादन प्रक्रिया करण्यात आल्याने नव्या संकटाला उद्योग सामोरे जाऊ लागले.

मात्र हा कालावधी फारसा नसल्याने महिन्याभरातच बाजारपेठेने उसळी घ्यायला सुरुवात केली. वाहन उद्योगांना चांगली संधी मिळत होती. बांधकाम क्षेत्रातही मागणी वाढू लागली. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसू लागला. यंदाच्या दिवाळीत बोनस चांगला मिळेल किंवा नाही. आधीच निम्मा असलेल्या वेतन पद्धतीमध्ये बोनस किती टक्क्यांनी मिळेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती.

मात्र जुलै ते ऑक्टोबर दरम्यान बाजारपेठेने उसळी घेतली होती. दोन वर्षापासून थांबलेले व्यवहार मोठ्या गतीने सुरू झाले होते. त्यामुळे बाजारपेठेला तेजी आल्याचे चित्र होते. परिणामी यंदाच्या दिवाळीत बोनस वाटप हे अतिशय दमदार पद्धतीने झाले. त्याचा परिणाम किरकोळ बाजारपेठेत चैतन्य दिसून आले.सुमारे 500 कोटी रुपयांचे बोनस वाटप झाल्याने नाशिकच्या बाजारपेठेत आर्थिक उलाढाल चांगली झाल्याचे दिसून आले. त्यात कपडे, भांडी,गृह प्रकल्प, वाहन यांची विशेष मागणी दिसून आली. उद्योगक्षेत्राला मागील दोन वर्षापासून आलेली मरगळ काही अंशाने यंदाच्या दिवाळीमध्ये झटकली गेली. ही समाधानाची बाब म्हणता येईल.

प्रत्यक्षात उद्योग उभारणीसाठी शहरातील अनेक जागांवर नवनवे प्रकल्प उभे राहताना दिसून आले.अनेक वर्षांपासून मोठ्या उद्योगाच्या उभारणीची मागणी उद्योजकांद्वारे केली जात होती. अखेर करोनापाठोपाठ ती पूर्ण झाली. रिलायन्स व इंडीयन ऑइल या दोन मोठ्या उद्योगांनी दिंडोरी येथील आक्राळे येथे सुमारे 250 एकरावर मेगा प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने तयारी केली. रिलायन्स उद्योगाने तर जागाही ताब्यात घेतलेली आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण झाले.

वर्षातील महत्वाच्या घडामोडी

आर्थिक नुकसान झालेल्या उद्योगांना 6 लाख 28 हजार कोटी रुपयांच्या मदतीची तरतूद

कष्टकर्‍यांना मोफत धान्य वाटप

असंघटीत नोंदीत बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांची मदत

भविष्य निर्वाह निधीच्या 2231 खात्यांतून दहा दिवसांत साडे चार हजार कोटी रुपयांची उचल

घरेलू महिला कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड

आंतरराष्ट्रीय पर्यटकांअभावी हॉटेल व्यवसाय डबघाईला

नाशिकमध्ये जांभळापासून रिसेव्हेरा वाइन उत्पादनाला प्रारंभ

रुग्णांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या 1752 पिशव्या रक्तदान

इमारत बांधकाम कामगारांना मध्यन्न व सायंकाळच्या भोजन वाटप सेवेला प्रारंभ

करोना काळात 73 टक्के लघु उद्योग तोट्यात

मनुष्यबळ कमी केल्याने हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाले आयएसओ मानांकन

नदीत प्रदूषण करणार्‍या 26 उद्योगांना प्रदूषण मंडळाची बंदची नोटीस

लोकप्रतिनिधींचा मतदार संघात अन्न व भाजीपाला वाटप

आगामी तिसर्‍या लाटेच्या धाकाने उद्योजक चिंतित

अंबड औद्योगिक क्षेत्रात 500 खाटांचे कोवीड सेंटर उभारणी गतिमान

मुंबईहुन गावी जाणार्‍या लोकांना सातपूरच्या शाळांमध्ये केले क्वारंंटाइन

करोनामुळे मार्च अखेरचा सरकारी दरबारी देण्याचा अहवाल राहीले प्रलंबित

उद्योग क्षेत्रातील पार्किंगच्या प्लॉटवरुन उद्योजक व वाहन चालक संघटना आक्रमक

जुनी प्लॅटेड इमारत धोकादायक सांगून उद्योजकांना रिकामे करण्याची एमआयडीसीची नोटीस

करोना काळात रस्ते मोकळे असल्याने हवेची सुधारली गुणवत्ता

सातपूरच्या बारा गाड्या उत्सवावर करोना सावट; बाल गणेशाने केले पूजन

नाशिक विमानतळ नाईट लँडींग सुविधेने सज्ज

25 मे पासून नाशिक -अहमदाबाद, शिर्डी, हैद्राबाद सेवेला प्रारंभ

10 जुलैपासून अलायन्स एअरलाईनची दिल्ली,अहमदाबाद,गोवा सेवा देण्याचा संकल्प

निमाच्या विश्वस्त पदावर तीन जणांची नियुक्ती

उद्योजक संघटनांच्या रखडलेल्या निवडणूकांंनी डिसेंबरमध्ये घेतली गती

- Advertisment -

ताज्या बातम्या