Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याईडीचा संजय राऊतांवर गंभीर आरोप; प्रवीण राऊत फक्त नावालाच...

ईडीचा संजय राऊतांवर गंभीर आरोप; प्रवीण राऊत फक्त नावालाच…

मुंबई | Mumbai

प्रवीण राऊत हे फक्त नावापरतेच आहेत, सर्व व्यवहार संजय राऊत करत होते. पत्राचाळ गैरव्यवहार संजय राऊतांमुळेच झाला, असा गंभीर आरोप ईडीने मुंबई सेशन कोर्टात केला आहे. तसेच संजय राऊतांना आठ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली आहे…

- Advertisement -

पत्राचाळ घोटाळ्यात (patra chawl case) काल रात्री उशिरा ईडीने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना अटक (Arrested) केली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जेजे रुग्णालयात (JJ Hospital) तपासणीसाठी नेले होते. यानंतर आता त्यांना ईडीच्या विशेष कोर्टात (PMLA) हजर करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या