Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रईडीची मोठी कारवाई : अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त

ईडीची मोठी कारवाई : अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त

मुंबई | Mumbai

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीने (Ed) जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई (Mumbai) आणि नागपूरमधील (Nagpur) ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे…

- Advertisement -

ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलालादेखील चौकशीसाठीचे समन्स बजाविण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावरच आरोप केले होते.

कोणत्या संपत्तीवर जप्तीची कारवाई?

अनिल देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे. दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख रुपये आहे.

किरीट सोमय्या म्हणाले…

ही तर सुरुवात आहे. माझ्या माहितीप्रमाणे १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीकडे आली आहे. आज ४ कोटी जप्त झाले आहेत, येत्या काही दिवसांमध्ये ते १०० कोटींपर्यंत जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ईडी अनिल देशमुखांना अटक करेल, असा दावा या कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या