वर्षा राऊतांना ईडीचे समन्स; राऊत कुटुंबियांची अडचण वाढली

वर्षा राऊतांना ईडीचे समन्स; राऊत कुटुंबियांची अडचण वाढली

मुंबई । Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (patra chal scam) शिवसेना खासदार (Shivsena mp) संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केल्यानंतर आता राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना उद्या (दि.५) शुक्रवारी ताबडतोब चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार (Financial transactions) झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत उद्या चौकशीसाठी हजर होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वर्षा राऊतांना ईडीचे समन्स; राऊत कुटुंबियांची अडचण वाढली
संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला; या तारखेपर्यंत ईडी कोठडी

दरम्यान, ईडीने संजय राऊत यांना अटक (Arrested) केल्यानंतर न्यायालयात (Court) हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी (Custody) सुनावली होती. त्यानंतर आज ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर राऊतांना न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे. तसेच आता वर्षा राऊत यांची चौकशी होणार असल्याने राऊत कुटुंबियांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com