Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ईडीचे समन्स

‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ईडीचे समन्स

नवी दिल्ली | New Delhi

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम (illegal Mining) प्रकरणी समन्स बजावला आहे. सोरेन यांना गुरुवारी चौकशीसाठी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे…

- Advertisement -

याबाबत ईडीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा (Pankaj Mishra) यांच्याविरोधातील तपासावेळी काही तथ्ये समोर आली असून त्यांची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पंकज मिश्रा बरहैट विधानसभा मतदारसंघाचे आमदार (MLA) असून त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल १ हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात (Special Court) दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या