काँग्रेसच्या बड्या नेत्याला ईडीचे समन्स

काँग्रेसच्या बड्या नेत्याला ईडीचे समन्स

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा अजून कर्नाटकात (Karnatka) पोहचलेली नाही. मात्र त्यापूर्वीच कर्नाटक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डी के शिवकुमार (DK Shivkumar) यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे...

याबाबत शिवकुमार यांनी सांगितले की, ईडीकडून (ED) चौकशी करण्यासाठी आज गुरुवार (दि.१५) समन्स बजावण्यात आले असून मी ईडीला संपूर्णपणे सहकार्य करणार आहे. मात्र आमच्या राजकीय वाटचालीत भाजपकडून (BJP) अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.याआधी शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) २०१९ मध्ये ५० दिवस तुरुंगात राहावे लागले होते.

दरम्यान, एकीकडे कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु असतांना दुसरीकडे कर्नाटकमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. याचदरम्यान डी. के. शिवकुमार यांना ईडीने समन्स पाठविल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com