काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ED चं समन्स

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ED चं समन्स

दिल्ली (Delhi)

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ED ने समन्स बजावले आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald case) हे समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे.

दरम्यान ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून लढणार.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com