Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशArvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी; म्हणाले,"चार राज्यांच्या विधानसभा...

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी; म्हणाले,”चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत…”

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची दारू धोरणातील घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी ११ वाजता ईडीकडून (ED) चौकशी केली जाणार आहे. दिल्लीच्या ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या नोटीसीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ईडीची नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. ईडीने भाजपच्या (BJP) इशाऱ्यावर नोटीस पाठवली असून मला ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत प्रचार करता न यावा यासाठी भाजपने रचलेले हे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ईडीने ही नोटीस तातडीने मागे घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची घेणार भेट

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, केजरीवाल सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांच्याशी संबंधित इतर 9 ठिकाणीही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. नेमकं कोणत्या प्रकरणात ही कारवाई सुरू आहे याची गुप्तता पाळण्यात आली आहे.

लाचेची मागणी झाल्यास बिनधास्त तक्रार करा

- Advertisment -

ताज्या बातम्या