Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ईडीचे दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ईडीचे दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) न्यायालयीन कोठडीत (judicial custody) असलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पत्राचाळ प्रकरणात ईडीने (ED) मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आज छापे (Raid) टाकले आहेत. ईडीच्या दोन टीमने सर्च ऑपरेशन सुरू केले असून कोण कोणत्या ठिकाणी छापे टाकण्यात आले याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना २२ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडी पुन्हा एकदा सक्रीय झाली असून आज याच्याशी संबधित मुंबईतील (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या