संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक, चौकशी सुरु

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने (ED) रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली.

सकाळी सात वाजता ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यासह भांडूप परिसरातील राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरात झाडाझडती आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची चौकशी अशा दुहेरी ऑपरेशनला सुरुवात केली आहे.

दरम्यान,त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. (ED raids Sena’s Sanjay Raut’s residence, questions him on Patra Chawl land scam case)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *