शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या संस्थांवर ईडीचे छापे


शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या संस्थांवर ईडीचे छापे
भावना गवळी

यवतमाळ:

शिवसेनेच्या (shiv sena)खासदार भावना गवळी (Bhawana Gawli)अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या 5 संस्थांवर ईडीने (ED)धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने त्यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या.

भावना गवळी
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

मुंबईहून ईडीचे पथक वाशिमला पोहोचले. त्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी खासदार गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचे वृत्त आहे.

काय आहे तक्रार

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याची तक्रार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com