Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाना पटोलेंचे वकील ईडीच्या ताब्यात; फडणवीसांविरोधात केली होती याचिका

नाना पटोलेंचे वकील ईडीच्या ताब्यात; फडणवीसांविरोधात केली होती याचिका

नागपूर | Nagpur

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर आज ईडीने (ED) छापा टाकला. सतीश उके यांच्यासोबत त्यांचे भाऊ प्रदीप उके (Pradip Uke) यांना देखील ईडीने ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात सतीश उके यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही धाड टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

सतीश उके यांनी फडणवीस यांच्या अनेक केसेस केलेल्या आहेत. त्यापैकीच एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. मात्र निकालाआधीच सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. तसेच याबाबत पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा गौप्यस्फोट सतीश उके यांचे लहान भाऊ शेखर उके (Shekhar Uke) यांनी केला आहे.

Visual Story : …म्हणूनच ‘बच्चन पांडे’ फ्लॉप; अक्षय कुमारची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, आज नागपुरातील (Nagpur) सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा (Raid) टाकला. जो व्यक्ती मोदी यांच्या सरकार विरोधात भूमिका मांडेल त्यावर केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून कारवाई होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

याबबत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आज मी नागपूरातील धाडीविषयी माहिती पाहिली. मला अनेकांनी नागपूरातून फोन केले. अनेक पत्रकार आणि वकिलांनी मला फोन केले. भविष्यात नाना पटोले यांच्यावरतीही धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ते नाना पटोले यांचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या