व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 'इतक्या' कोटींचे घबाड जप्त

व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 'इतक्या' कोटींचे घबाड जप्त

नवी दिल्ली | New Delhi

मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering) एका व्यावसायिकाच्या घरी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता मोठे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. घरात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम आढळून आली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ६ ठिकाणी छापा (Raid) टाकला असता त्यात तब्बल १७.३२ कोटी रुपयांची रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे.

गेमिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी या व्यवसायिकाच्या घरी धाड टाकण्यात आली. ईडीने शनिवारी सकाळी ८.३० वाजेपासून कोलकाता (Kolkata) शहरातील सहा ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती.

दरम्यान, या मोहिमेत १५ कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर आणखी घबाड सापडले असता पैसे (Money) मोजण्यासाठी जास्तीच्या मशीन अधिकाऱ्यांना मागवाव्या लागल्या. त्यात ५०० आणि २००० च्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com